"हो.. का नाही?" माझं नेहमीचं उत्तर...
मोत्याच्या दाण्यासारखे पांढरे शुभ्र दात कोणाला नाही आवडणार आणि याचाच फायदा घेतात टूथब्रश टूथपेस्ट कंपनीवाले. यात खरं काय खोटं काय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे.
दाताच्या सगळ्यात वरचं आवरण असतं जे सगळ्यात पांढरं असतं. दात पिवळे दिसतात म्हणजे एकतर हे आवरण निघून जातं नाहीतर झाकलं जातं. हे आवरण निघून जायला खूप कारण आहेत. असे दात सफेद करायला खूप प्रकारच्या ट्रीटमेंट येतात. ते मी पुढच्या लेखात सविस्तर सांगेन आणि आवरण झाकले गेले याचं प्रमुख कारण म्हणजे दात नीट न घासणे. आता यात पण दाताच्या वरची साचलेली घाण मऊ असेल तर ब्रश ने सहज निघते आणि दात पांढरे होतात. हीच घाण खूप दिवस दातांवर तशीच राहिली तर दाताच्या आजूबाजूला जमते. घट्ट होते आणि अजून पिवळी पडते. ही घाण आपण ब्रश ने काढू शकत नाही. ती डेंटिस्ट कडे जाऊन मशीन ने काढावी लागते. यानंतर तुमचे दात स्वच्छ आणि पांढरे दिसू लागतात.
दात पांढरे करणाऱ्या पेस्ट बाजारात मिळतात त्याने दात पांढरे होतात असा दावा कंपनी करतात. पण या पेस्ट मध्ये असणाऱ्या केमिकल ची आपल्या दातावर रिअँक्शन होते म्हणून त्याचा रंग शुभ्र होतो. थोड्या अवधी साठी अशी टूथपेस्ट आपण वापरू शकतो पण नेहमीसाठी वापरल्यास त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
जोर लावून दात घासून पांढरे करूया असा विचार करत असाल तर आताच थांबा. याने उलट दातांच्या वरचं आवरण निघून जाते आणि दात अजूनच पिवळे दिसतात.
चला तर मग... आजपासून दात खूप घासून त्यांना पांढरे बनवण्यासाठी मागे लागण्यापेक्षा हळूवार नीट घासून स्वच्छ ठेऊ.
डॉ. स्मितल नितीन पवार
उज्ज्वल दातांचा दवाखाना
नाशिक.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhup Chaan
उत्तर द्याहटवाधन्यवाद. दातांच्या आरोग्याशी निगडीत महिती अशीच तुम्हाला देत राहण्याचा प्रयत्न करेन.
हटवाDoctor, give us the exact address of your Dental Clinic
उत्तर द्याहटवाडॉ. स्मितल पवार,
हटवाउज्ज्वल दातांचा दवाखाना,
शॉप नं. 3
ओयासिस अपार्टमेंट,
के. एस.मार्ग., म्हसरूळ
नाशिक.
Khup mast smital, keep it up
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाखूप छान माहिती दिलीस. सामान्यतः दात दिवसातुन किती वेळा आणि किती वेळ घासावेत या बद्दल सांगशील का?
उत्तर द्याहटवावेळ काढून दातांबद्दल ची माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद.. दातांची स्वच्छता कशी ठेवावी या बद्दल नक्कीच विस्ताराने लिहीन.
हटवाVery nice information. Please do write about how to take care of children's teeth.
उत्तर द्याहटवाह्या लेखावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवालहान मुलांच्या दाताची काळजी हा ही मोठा प्रश्न असतो पालकांसमोर. मी नक्कीच याची माहिती देईन.